Central Railway : मध्य रेल्वेच्या ट्रेन आता हरित ऊर्जेवर धावणार, पवन ऊर्जा प्रकल्पांमधून घेणार

Continues below advertisement

मध्य रेल्वेच्या गाड्या आता हरित ऊर्जेवर धावणार आहेत. कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने तब्बल ३४७ मेगावॉट वीज सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध वीजनिर्मिती कंपन्यांसोबत वीजखरेदी करार केले आहेत. रेल्वेला सध्या दररोज सुमारे ५५० मेगावॉट वीज लागते. ही वीज एनटीपीसी, आरजीपीपीएल, महावितरण अशा विविध कंपन्यांकडून रेल्वे खरेदी करते. मात्र या कंपन्या कोळश्यावर वीजनिर्मिती करतात, त्यामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होतं. ते कमी करण्यासाठी आता अधिकाधिक हरित ऊर्जा वापरण्याचं धोरण रेल्वेनं आखलं आहे. यामुळे १ हजार ६७० कोटींची बचत देखील होणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram