Mumbai : मध्य रेल्वेवर लोकलच्या 80 हून अधिक फेऱ्या वाढणार, नव्या मार्गिकेवर एसी लोकल धावणार
मध्य रेल्वेवर पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलच्या 80 हून अधिक फेऱ्या वाढणार आहे. मात्र या सर्व फेऱ्या एसी लोकलच्या असणार आहेत. नवीन वेळापत्रक भरून काढण्यासाठी एसी लोकल चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. दरम्यान ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर धावत असलेल्या एसी लोकल बंद करुन, त्या सर्व एसी लोकल मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावर चालवण्याचा विचार आहे.