Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर आज 18 तासांचा मेगाब्लॉक, 'या' एक्स्प्रेस रद्द ABP Majha

Continues below advertisement

Mumbai Local Mega Block : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांनी आज गरज असेल तरंच मध्य रेल्वेच्या लोकलनं प्रवास करावा, अन्यथा प्रवास टाळावा. कारण आज मध्य रेल्वेवर तब्बल 18 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण करण्यासाठी सकळी 8 वाजल्यापासून ते मध्यरात्री दोनपर्यंत ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकसाठी लोकलच्या 160 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन्सही आज रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गरज असेल तरचं आज मध्य रेल्वेचा लोकल प्रवास करा. 

मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्तांनी शुक्रवारी या मार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यांच्या मंजुरीनंतर या मार्गाच्या कामासाठी आज (रविवारी) 18 तासांचा मेगाब्लॉक घेण्याचं निश्चित करण्यात आलं. 

रविवारी मध्य रेल्वेवर सकाळी 8 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याआधी शुक्रवारी मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या पाहणी आणि मंजुरीनंतर हा मेगाब्लॉक घेतला जात आहे. ब्लॉकमुळे कमी लोकल आज धावणार आहेत. तर मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या मार्गिकेचे काम जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram