Maharashtra : ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय परवा होणाऱ्या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
२१ डिसेंबर म्हणजे परवा, १०६ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत१५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या राजकीय रणसंग्रामावर असणार आहे. दरम्यान या निवडणुकांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.