अभिनेता Sahil Khan सह तिघांविरोधा गुन्हा दाखल, मनोज पाटीलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप
अभिनेता साहिल खानसह तिघांविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिस्टर इंडिया मनोज पाटील याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मनोज पाटीलवर मुंबईतील कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.