Uddhav Thackeray : 'एकत्र आलो तर भावी सहकारी'; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु आहे. राज्यात आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.