Aaditya Thackeray : लोअर परेल उड्डाणपुलाप्रकरणी आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आालाय. गुरूवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले . महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचं उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरू केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय..
Continues below advertisement