Avinash Bhosale Corona Positive: न्यायालयीन कोठडीत असलेले उद्योगपती अविनाश भोसले यांना कोरोनाची लागण
Continues below advertisement
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले उद्योगपती अविनाश भोसले यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना उपचारांसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार भोसले यांना दहा दिवसांआधी नियमित तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्यावेळी तपासणीदरम्यान झालेली त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळं अविनाश भोसले यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भोसले यांना आधी सीबीआयनं आणि नंतर ईडीनं अटक केली आहे.
Continues below advertisement