Mumbai Crime | भावाकडून बहिणीच्या पतीची हत्या, पत्नीसोबत गैरवर्तन केल्याच्या रागातून मारलं | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2020 12:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बहिणीचा पती तिच्याशी नीट वागत नाही म्हणून एका महिलेच्या दोन भावांनी मित्रांच्या मदतीनं तिच्या पतीची हत्या केल्याची घटना विक्रोळीमध्ये घडलीय.सिद्धार्थ सातपुते असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांना जेव्हीएलआरच्या गांधीनगर जंक्शनजवळ असलेल्या झुडुपात एक मृतदेह आढळला होता. परंतु त्याची ओळख पटत नव्हती. अखेर अंगावरील टॅटूमुळे त्याची ओळख पटली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही हत्या मयत इसमाच्या पत्नीच्या भावानं केल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी रवींद्र टाक आणि निखिल टाक यांना ताब्यात घेतलं. त्यांनी ही हत्या आपले मित्र साईनाथ वाडेकर आणि आयन शेख यांच्या मदतीनं केल्याची कबुली दिली. सिद्धार्थ हा बहिणीला मारहाण करीत असे. तिचे काही फोटो त्यानंच व्हायरल करून तिची बदनामी केली होती. त्याचा राग असल्यानं आपण सिद्धार्थची हत्या केल्याचं त्यांनी कबूल केलं.