Borivali Landslide : देवीपाडा मेट्रो स्टेशनजवळ जमीन खचल, खाजगी इमारतीचं सुरू होतं बांधकाम ABP Majha

Continues below advertisement

मुंबई-उपनगरात सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे मागाठाणे येथील मेट्रो स्टेशनजवळ जमीन खचल्याची घटना घडलेय.. मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळ एका खाजगी इमारतीचे बांधकाम सुरू होतं. मुसळधार पावसातच बांधकाम काम सुरू असल्यामुळे जमीन खचली गेली, सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रो स्टेशनचे उत्तरेकडचे प्रवेशद्वार तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. तसंच महापालिकेने वाहतुकीसाठही रस्ता बंद केलाय. असून दुरुस्तीचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. दरम्यान सदर प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कस्तुरबा मार्ग पोलिसांनी कंत्राटदार आणि अभियंत्यावर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे,

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram