Mumbai : नारायण राणेंना मुंबई मनपाची नोटीस, जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार

Continues below advertisement

मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाबाबत नोटीस पाठवली आहे. राणेंच्या मुंबईतील जुहू इथल्या  बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार असून बंगल्याची तपासणी करण्यासाठी महापालिकेनं नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचं पथक आज राणे यांच्या अधीश बंगल्यात पाहणी करून अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीबाबत तपासणी करेल अशी नोटीस राणे यांना पाठवली आहे. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याबाबत तक्रार केलीय. बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची याआधी तक्रार करूनही महापालिकेनं कारवाई केली नसल्याचं दौंडकर यांनी महापालिकेला कळवलंय. त्यानंतर महापालिकेनं ही नोटीस पाठवली आहे. बंगल्याचं बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram