Mumbai Corona Update | कोरोनाच्या गंभीर परिस्थितीबाबत मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लॅन तयार
Continues below advertisement
सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच मुंबईतही कोराना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशातच अनेक रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणं कठिण झालं आहे. तर अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये बेड अडवून ठेवत असल्याचंही निदर्शनास आल्यामुळे आता महापालिकेनं अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. फास्ट ट्रॅक पद्धतीनं बेड वाटप करण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
Continues below advertisement