टास्क फोर्सच्या बैठकीत मतभिन्नता?काहींचा कडक लॉकडाऊनचा सल्ला तर काहीना लॉकडाऊनच्या परिणामांबाबत शंका
14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे, अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्रीच लॉकडाऊनची घोषणा करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या ऑनलाईन बैठकीत लॉकडाऊन लागू करण्यासह विविध विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीत लॉकडाऊनला कसं सामोर जायचं, याबाबत चर्चा झाली. राज्यात लॉकडाऊन लावायचा झाला तर प्रत्येक विभागाची तयारी, पुढील गणितं आणि आर्थिक बाजूची माहिती घेणार, टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनची दाहकता किती ठेवायची? यावर चर्चा झाली. रुग्णसंख्या जिकडे जास्त असेल तिकडे कडक लॉकडाऊन गरजेचं, जास्त कडक लॉकडाऊन लावलं तर सामान्य जनतेचे हालही नाही झाले पाहिजे यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचं तर किती दिवसाचं करायचं? राज्यातली आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी याचं नियोजन किती पटीनं आणि कसं वाढवले गेले पाहिजे? यावरही बैठकीत चर्चा झाली.