Mumbai BMC चा महत्वाकांक्षी सायकल ट्रॅक प्रकल्प बारगळणार?

 मुंबई महापालिकेचा पूर्व उपनगरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प बारगळण्याची चिन्ह आहेत. पालिकेच्या पुढाकारानं पवई तलावानजीक उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅक प्रकल्पाच्या कामाला दिलेली स्थगिती हायकोर्टानं 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. पालिका आणि राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी आणखीन वेळ हवा असल्याचं मंगळवारी कोर्टाला कळवण्यात आल्यानं हायकोर्टानं ही सुनावणी 13 डिसेंबरपर्यंत तहकूब केली. या प्रकल्पाविरोधात आयआयटी पवईतील दोन विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ज्यावर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सुनावणी झाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola