मुंबई महापालिकेचा विकासकांना मोठा दिलासा; विकासकांना मालमत्ता अधिमुल्यात 50 टक्के सूट
मुंबई महापालिकेनं विकासकांना मोठा दिलासा दिलाय. विकासकांना मालमत्ता अधिमुल्यात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय महासभेत मंजूर करण्यात आलाय. महापालिकेच्या भूखंडावर विकसित करण्यात येणाऱ्या इमारतींसाठी ही सूट लागू असणार आहे. कोरोना काळात विकासाला चालना देण्यासाठी ही सूट देण्यात यावी, अशी शिफारस राज्य सरकारनं केली होती. याला भाजपनं विरोध दर्शवला होता. यामुळे मुंबई महापालिकेला तब्बल 2500 कोटींचं नुकसान सोसावं लागणार आहे.