Kolhapur | रविकिरण पेपर मिलच्या कामगारांचं बेमुदत उपोषण; 2 आंदोलकांची प्रकृती बिघडली
कोल्हापुरात रविकिरण पेपर मिल च्या कामगारांच 15 व्या दिवशीही बेमुदत आमरण उपोषण सूरूच आहे. चंदगड तालुक्यातील हलकर्णी एमआयडीसीमध्ये रविकिरण पेपर मिल कंपनी कार्यरत आहे. मिलमधील कामगारांना योग्य मोबदला दिला जात नाही. आठवड्याची सुट्टी दिली जात नाही. कामगारांनी वेळोवेळी मागणी करून दखल घेतली जात नसल्यामुळे नाइलाजाने संप केलाय, असं येथील कामगारांच म्हणणं आहे. तसच कोणतेही कारण न देता स्थानिक कामगारांनाही कामावरून कमी करण्यात आलय. स्थानिक कामगारांच्या मते, या रविकिरण पेपर मिलमध्ये सध्या ५० हून अधिक उत्तर भारतीय कामगार कामावर आहेत. मात्र स्थानिकांना कामावरुन काढण्यात येतय.