Navneet Ravi Rana यांना BMC ची नोटीस, घराचं अवैध बांधकाम का तोडू नये, राणा दाम्पत्याला सवाल
Continues below advertisement
Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई पालिकेकडून नवनीत राणा यांच्या घराला पुन्हा नोटीस देण्यात आला आहे. घराचं अवैध बांधकाम का तोडू नये, असा सवाल राणा दाम्पत्याला पालिकेने केला आहे.
खार परिसरात लाव्ही इमारतीच्या आठव्या मजल्यावर रवी राणा यांचा फ्लॅट आहे. रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केले आहे. या घराची बाल्कनी वाढवली आहे. याच वाढीव बांधकामावर मुंबई महापालिकेने आक्षेप घेतला आहे. मुंबई महापालिकेकडून राणा दांपत्यास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. पुढच्या सात दिवसांत नोटीसीचे उत्तर द्या, असे मुंबई महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Bmc Marathi News ABP Maza Ravi Rana Navneet Rana Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv