Navratri Festival | नवरात्रोत्सवासाठी मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर, काय आहेत नियम आणि अटी?

सार्वजनिक नवरात्रौत्सवाबाबत मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान पालन केलेली कार्यपद्धती नवरात्रोत्सवात देखील लागू असतील. सार्वजनिक मंडळांकरिता कमाल 4 फूट, तर घरगुती देवींच्या मूर्तींची उंची 2 फुटांच्या मर्यादेत असावी. त्याचबरोबर देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी आणि सर्व मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola