BMC Elections | शिंदेंची शिवसेनेचा महायुतीकडे 110 ते 114 जागांचा आकडा ठेवणार
Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत सर्वे सुरू करण्यात आले आहेत. शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने अनेक वॉर्डांमध्ये जागा एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षांतर्गत सर्वे आणि निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. पक्षातील माजी नगरसेवकांची संख्या विचारात घेऊन शिवसेनेकडून ११० ते ११४ जागांच्या मागणीचा पहिला प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. या परिस्थितीत तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते कसा सुवर्णमध्य काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतील सद्यस्थिती या सर्वेमुळे स्पष्ट होईल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement