BMC Election Ward Reservation: यशवंत जाधव, राखी जाधव, महाडेश्वरांना धक्का, दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित
BMC Election 2022 Reservation Lottery : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2022) आरक्षण सोडत (Ward Reservation) जाहीर करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा ओबीसी आरक्षण (OBC reservation) सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज ही प्रक्रिया पार पडत आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर आता एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता, यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करुन, नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढण्यात आले.
आज एससी, एसटी प्रवर्गाचे यापूर्वी घोषित झालेले आरक्षण वगळता 236 पैकी 219 प्रभागांची आरक्षण लॉटरी काढण्यात आली. 219 पैकी 63 प्रभाग हे ओबीसी आरक्षित झाले आहेत. 63 पैकी 53 प्रभागात गेल्या तीन निवडणुकांमधे एकदाही ओबीसी आरक्षण आलेले नसल्याने नियमानुसार 53 वॉर्ड ओबीसी आरक्षितच होतील. तर सर्वसाधारण 157 प्रभागांपैकी 77 प्रभाग महिला आरक्षित होतील.