BMC Election : सहा नवे वॉर्ड शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या विधानसभा क्षेत्रात
Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मूळच्या २२७ वॉर्डसची संख्या नऊनं वाढून २३६ वॉर्डसवर जाणार आहे. मुंबई महापालिकेतील हे नऊ वॉर्डस कोणत्या विधानसभा मतदारसंघात याबाबतची माहिती अधिकृतरित्या उद्या जाहीर होणार आहे. पण एबीपी माझाला ती माहिती आदल्या दिवशीच मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात तीन, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी तीन वॉर्डस वाढणार आहेत. मुंबई शहरमधल्या वरळी, परळ आणि भायखळा विधानसभात मतदारसंघांत महापालिकेचा एकेक वॉर्ड वाढण्याची शक्यता आहे. पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि मानखुर्द तर पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्व, कांदिवली आणि दहिसर विधानसभात मतदारसंघांत मुंबई महापालिकेचा प्रत्येकी एकेक वॉर्ड वाढण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Budget Bmc Bmc Election Union Budget Union Budget 2022 Budget 2022 Budget India Nirmala Sitharaman Union Budget Budget In India Indian Budget Union Budget Highlights Union Budget 2022 Date Union Budget 2022