BMC ने लशींच्या पुरवठ्यासाठी काढलेलं ग्लोबल टेंडर अखेर रद्द, अटी शर्तीची पूर्तता न झाल्याने निर्णय
Continues below advertisement
मुंबई : पुरवठादारांकडून अटी शर्तीची पूर्तता न झाल्याने ग्लोबल व्हॅक्सिन टेंडर रद्द करण्यात आलं असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. पुरवठा करणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न होता कारण यात एकही निर्माता नव्हते. केंद्र सरकार व्हॅक्सिन देतं आहे, त्यांनी खासगीऐवजी पालिका आणि राज्याला मुबलक प्रमाणात पुरवठा करावा, असं त्या म्हणाल्या. त्यांनी म्हटलं की, महापालिकेच्या माध्यमातून अनेक दिग्गजांनी लस घेतल्या आहेत. सर्वांना मोफत लस देत आहोत आणि देणार, यासाठीच सर्व प्रयत्न आहेत, असं त्या म्हणाल्या.
Continues below advertisement
Tags :
Vaccination Mumbai Bmc BMC Mayor Kishori Pednekar Mayor Kishori Pednekar Global Tender BMC Global Tender