Nanded Police : नांदेड पोलिसांकडे बॉडी वॉर्न कॅमेरे, पोलिसांचा तिसरा डोळा ठेवणार नागरिकांवर नजर
कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, तरीपण काही नागरिक नियमांची पायमल्ली करत गर्दी करताना दिसून येतात. या नागरिकांकडून दंडाची रक्कम वसूल केली जाते. या रकमेचा फायदा पोलीस विभागाला होऊन त्यांच्यासाठी काही उपयोगी यंत्रसामुग्री खरेदी केली जावी अशा सूचना विभागीय आयुक्त यांनी दिल्या होत्या. याबाबत नांदेड पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पाठपुरावा करत वाहतूक पोलिसांसाठी बॉडी वॉर्न कॅमेरा खरेदी केले आहेत.