Omicron च्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क, माहुल परिसरात ऑक्सिजन प्लांटची उभारणी

Continues below advertisement

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार आणि मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूविरोधातल्या लढाईत मुंबईला ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी मुंबईत नवा जम्बो ऑक्सिजन प्लान्ट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी पूर्व उपनगरातल्या माहुल परिसरात ऑक्सिजन प्लान्टला भेट देऊन तिथल्या कामाचा आढावा घेतला. भारत पेट्रोलियम आणि मुंबई महापालिकेच्या वतीनं लवकरच सुरू होणाऱ्या या प्लान्टमधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram