Mumbai Local Black Box : लांब पल्ल्यांच्या इंजिनसह मुंबई लोकलमध्ये ब्लॅक बॉक्स बसवणार!
Continues below advertisement
विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये ब्लॅक बॉक्स असतो हे साऱ्यांनाच माहिती आहे. विमान आणि हेलिकॉप्टर अपघाताची कारणं शोधण्यासाठी हे ब्लॅक बॉक्स महत्त्वाचे ठरतात. अपघातावेळी नेमकं काय घडलं होतं हे ब्लॅक बॉक्समधून समोर येतं. आता विमान आणि हेलिकॉप्टरप्रमाणेच मुंबईमधील लोकलमध्येही ब्लॅक बॉक्स लावण्यात येणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात २.३ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. या सीव्हीव्हीआरएस यंत्रणेमुळे आणीबाणीच्या प्रसंगी मोटरमनच्या कॅबमधील सर्व घटना रेकॉर्ड होण्यास तर मदत होणार आहेच, शिवाय ट्रेनसमोरच्या कॅमेऱयांमुळे अपघातातील तपशील जतन करणे सोपे होणार आहे. लांब पल्ल्यांच्या इंजिनासह उपनगरीय लोकलच्या मोटरमन व गार्डच्या कॅबमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
Continues below advertisement