BKC Ground: BKC मधलं दुसरं मैदान बुक करणाऱ्या कंपनीचं नाव 'माझा'वर! या कंपनीमुळे सेनेचा पर्याय हुकला
abp majha web team
Updated at:
19 Sep 2022 11:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतल्या बीकेसी परिसरात एमएमआरडीएचं एक मैदान आरक्षित केलं आहे. याच परिसरातल्या कॅनरा बँकेजवळच्या दुसऱ्या मैदानासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं अर्ज केला होता. पण तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं अर्ज केला ते मैदान एका खाजगी कंपनीनं आधीच बुक केलं आहे. कॉलिन्स इव्हेण्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मागणीमुळेच शिवसेनेचा बीकेसीतल्या मैदानाचा पर्याय हुकल्याचं कळतं.