BMC Elections : मुंबई महापालिका निवडणुकीचा नारळ मातोश्रीच्या दारातून फुटणार
BMC Elections : कुठल्या क्षणी मुंबई महापालिका निवडणुका घोषित होतील, त्याआधी मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच भाग असलेल्या जागर मुंबईचा यात्रेला उद्या सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे मातोश्रीच्या दारातून ही यात्रा सुरू होईल. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला थेट आव्हान देण्यासाठी भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जागर मुंबईचा यात्रेची सुरुवात केली आहे. या यात्रेची सुरुवात उद्या वांद्रे पूर्व येथील गव्हर्मेंट कॉलनी मधून होईल. पहिल्या दिवशी आशिष शेलार आणि पुनम महाजन यांच्या सभेने या अभियानाची सुरुवात होणार आहे.