Shushrusha Hospital Old Viral Video | सुश्रुषा रुग्णालयातील दुरवस्थेचा जुना व्हिडीओ भाजपकडून ट्विट
राज्य भाजपनं जवळपास महिनाभरापूर्वीच्या सुश्रुषा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या दुरावस्थेचा एक व्हीडिओ ट्विट केलाय. त्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा व्हीडिओवरुन भाजपवर जोरदार टीका केलीय. महिन्याभरापूर्वीचा व्हीडिओ टाकून जनतेत असंतोष पसरवण्याचा भाजपचा हा कुटील डाव असल्याचा आरोप सावंत यांनी केलाय. या व्हीडिओवरुन आता जोरदार राजकारण रंगताना दिसतंय.