BMC Electionमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची नवी व्यूहरचना, 'मराठी कट्टा' नावाचा उपक्रम सुरु करणार
आगामी BMC Mumbai Mahapalika Election मनपा निवडणुकीमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनं नवी व्यूहरचना आखली आहे. भाजप एक ऑक्टोबरपासून मराठी कट्टा नावाचा उपक्रम सुरु करणार आहे. नितेश राणे आणि सुनील राणे यांच्या मराठी कट्टाच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. या मराठी कट्ट्यावर भाजपचे दिग्गज नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.