BJP Signature Campaign : उद्याचं भविष्य म्हणजे मोदीजी, उद्याचा भारत म्हणजे मोदीजी- शेलार

Continues below advertisement

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी नंतर मनसेने एक सही संतापाची अभियान राबवलं. आता भाजप देखील याला उत्तर देताना पहायला मिळत आहे. भाजप युवा मोर्चाच्या वतीने आजपासून एक सही भविष्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलीय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते या मोहिमेची सुरूवात माटुंगा येथील रुईया कॉलेजसमोर करण्यात आलाय. मुंबईतील सर्व महाविद्याल्यांच्या समोर ही सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. तसंच उद्याच भविष्य म्हणजे मोदी, उद्याचा भारत म्हणजे मोदीजी त्यामुळे एक सही भविष्यासाठी ही मोहीम सुरू झालीय. लोकांचा संपर्क पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजपचा कार्यकर्ता करेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram