Kalyan Dombivali : कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का! भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेच्या गळाला

Continues below advertisement

कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या भाजपच्या 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय..महेश पाटील, सुनिता पाटील, सायली विचारे यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय..पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश पार पडला. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीचा भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. यामुळं भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेला आंदोलनांच्या माध्यमातून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात होता .मात्र शिवसेनेने भाजपचेच माजी नगरसेवक आपल्या गळाला लावत भाजपलाच कोंडीत पकडलं आहे .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram