BJP vs MVA : मविआचा महामोर्चा तर भाजपचं माफी मांगो आंदोलन, मुंबईत भाजप-मविआ आमने-सामने

Continues below advertisement

महापुरुषांबद्दल झालेली वादग्रस्त वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, महाराष्ट्राबाहेर गेलेले प्रकल्प याशिवाय विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्यासाठी उद्या महाविकास आघाडीनं महामोर्चाचं आयोजन केलंय... आणि या महामोर्चाला उत्तरं देण्यासाठी भाजपनं देखील आता कंबर कसलीय... भाजप उद्या मुंबईभर माफी मांगो आंदोलन करणार आहे. संजय राऊतांनी आंबेडकरांच्या जन्मस्थळासंदर्भात केेलेलं वक्तव्य, तसंच सुषमा अंधारेंवर वारकऱ्यांकडून होणारी टीका यावर शेलारांनी बोट ठेवलंय... आणि यासंदर्भात उद्धव ठाकरे मौन सोडणार का असा प्रश्न उपस्थित केलाय. दरम्यान उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी माफी मागावी ही मागणी करत उद्या मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात भाजप काळे झेंडे दाखवून निदर्शने करणार आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram