Sharad Pawar : उदयनराजेंनी चांगली भूमिका घेतली, शरद पवारांकडून पहिल्यांदाच कौतुक

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता, केंद्र आणि राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोप शरद पवारांनी केला.  ते कराडमध्ये (Karad) एबीपी माझाशी बोलत होते.  या गृहस्थांनी (राज्यपाल) ज्या पद्धतीचे उद्गार शिवछत्रपतींबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) काढले ते चुकीचे होते. मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. तो बदल झालेला कदाचित आपल्याला पाहायला मिळेल, असं शरद पवार म्हणाले.  

उदयनराजेंची भूमिका चांगली (Sharad Pawar on Udayanraje Bhosale)

उदयनराजेंनी भूमिका चांगली घेतली. त्याबाबत समाधान आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे, असं शरद पवार म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola