BJP Mumbai Rally : भाजपकडून मुंबईतील मोर्चा रद्द, आशिष शेलार याचं ट्विट : ABP Majha
बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजप आणि महायुतीचे "आक्रोश आंदोलन" आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं ट्विट भाजप नेते आशिष शेलार यांनी केलाय. त्याचवेळी आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही. पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू, असंही शेलार यांनी स्पष्ट केलं