भाजप नेते Mohit Kamboj यांच्याकडून Nawab Malik यांच्याविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार
Continues below advertisement
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेते मोहित कंबोज यांच्यात सुरु झालेला वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. मलिक यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कंबोज यांनी केलाय. गेल्या महिन्याभरातील घटनांचा उल्लेख असलेलं पत्र आणि या संदर्भातील सर्व पुरावे मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्याचं कंबोज यांनी सांगितलंय. नबाव मलिक यांच्याकडून पदाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केलाय. त्यामुळे मलिक यांना पदावरुन हटवण्याची मागणी केलीय.
Continues below advertisement