माझे आणि माझ्या बापाचे काय नातं आहे, हे साहेबांना विचार; चित्रा वाघांचं अमोल मिटकरींना उत्तर
मुंबई : अमोल मिटकरी राजकारणात अजून नवा भिडू आहे. अमोल मिटकरीला काय माहिती आहे. नवीन आमदार झालाय चांगलं काम कर. बाकी माझं आणि साहेबांचं नातं काय हे माझ्या बापाला जाऊन विचार भावा, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेला उत्तर दिलंय. आज चित्रा वाघ यांनी आयपीसी सेक्शन 67 अंतर्गत बिकेसी येथील सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये येऊन गुन्हा दाखल केला. यावेळी माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. अमोल मिटकरी यांनी ट्विट करून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती की, आपण साहेबांच्या तालमीत तयार झाला आहात त्यामुळे दिशाभूल करू नये. याला आज चित्रा वाघ यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं.