जोपर्यंत शिवसैनिकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जाणार नाही, माहिम पोलीस ठाण्यात भाजपचा ठिय्या
शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात आलं. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथं जमले. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसून आले. यावेळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.