Murji Patel Andheri East Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीला लागा, भाजपचे मुरजी पडेलांना निर्देश
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMurji Patel Andheri East Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीला लागा, भाजपचे मुरजी पडेलांना निर्देश
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये रस्सीखेच सुरू असताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुरजी पटेल यांना निवडणूक लढवण्यासाठी तयारी लागा असा निर्देश देण्यात आले आहेत. भाजपकडून देण्यात आलेल्या निर्देशानंतर मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, पेढे भरवून एकमेकांचे अभिनंदन केले.
यापूर्वी भाजपचे आमदार अमित साटम यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन अंधेरी पूर्व विधानसभा भाजप लढणार आणि कमळावरच लढणार असा दावा केला होता. यानंतर आता थेट मुरजी पटेल यांना वरिष्ठांकडून निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागा असे निर्देश देण्यात आल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. त्यानंतर मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांकडून फटाके आणि पेढे भरवून जल्लोष करण्यात आला.
सध्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळी ही जागा जर भाजपकडे आली तर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल विरुद्ध ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके असा सामना होण्याची शक्यता आहे.