Balasaheb Thackeray | अभिवादन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचा जबरा फॅन शिवतीर्थावर
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी बाळासाहेबांचा एक जबरा फॅन शिवतीर्थावर आला आहे. मोहन यादव असं त्यांचं नाव आहे ते गेल्या 21 वर्षांपासून शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. बाळासाहेब हयात असताना जिथे जिथे त्यांची सभा असायची ते आवर्जून हजेरी लावायचे. आताही उद्धव ठाकरे यांची सभा असेल तिथे आवर्जून आपली दुचाकी घेऊन हजेरी लावतात. संपूर्ण भगव्या रंगात ही दुचाकी सजवलेली आहे. त्यावर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधीस राहुल गांधी यांचे फोटोही बघायला मिळतात.