Bhiwandi Rains : भिवंडी शहरातील रस्ते पाण्याखाली, मुख्य बाजारपेठ,तीन बत्ती,भाजी मार्केट परिसरात पाणी
भिवंडी शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ ,तीन बत्ती, भाजी मार्केट मंडई परिसरात 2 ते 3 फुटांपर्यंत पावसाचे पाणी साचलं आहे. तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. या परिसरातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी महापालिका आपत्कालीन व्यवस्थापनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे.