Bhiwandi | नोटीस न देता पुनर्वसन केलेल्या गाळ्यावर कारवाई, स्थानिकांचा आरोप | ABP Majha
Continues below advertisement
भिवंडी महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणाच्या कारवाई वेळी जोरदार राडा पाहायला मिळाला. पालिकेने नोटीस न देता पुनर्वसन केलेल्या गाळ्यांवर कारवाई केल्यानं स्थानिक आक्रमक झाले. यावेळी जेसीबीवर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही गाळेधारकांना ताब्यात घेतले. मात्र, बिल्डरांच्या फायद्यासाठी ही सर्व कारवाई करण्यात येत असल्याचा नागरिकांना आरोप आहे. १९९१ ते ९२ या काळात रस्ता रुंदीकरणासाठी तोडक कारवाई झाली होती. त्यावेळी पालिकेनं रहिवाशांचं शिवाजी चौक ते खाडीपार इथे पुनर्वसन केलं. यात ७८ गाळे पालिकेने दिले होते. मात्र, याही गाळ्यांवर आज तोडक कारवाई करण्यात आली.
Continues below advertisement