Sangli | वांगीत स्मशानभूमीच्या वादामुळे 26 तासांनी मृतदेहाचा दफनविधी | सांगली | ABP Majha
Continues below advertisement
स्मशानभूमीच्या वादातून 26 तासांपासून एका मृतदेहाची अंत्यविधीविना हेळसांड सुरू होती. 26 तासानंतर मात्र तोडगा न निघाल्याने मयत महिलेच्या घराशेजारीच शेवटी त्या महिलेचे दफन करण्यात आले. सांगलीच्या कडेगावच्या वांगी येथे हा प्रकार घडला आहे. जिल्हाधिकारी यांनी वांगी गावातील आणि या मयत महिलेच्या समाजातील लोकांची 30 जानेवारी रोजी एक बैठक बोलावली असून यात या यावर तोडगा काढला जाईल, असे सांगितले. स्मशानभूमीच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे वांगी गावात तणावाचे वातावरण निर्माण होते.
Continues below advertisement