Hingoli-Parbhani Rains | हिंगोली, परभणीत रात्रभर मुसळधार पाऊस; नदी प्रवाहित, शेतशिवारात पाणी

हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव आणि हिंगोली या पाचही तालुक्यांमध्ये रात्री मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या तसंच पहाटेही काही भागात रिपरिप सुरु होती. या मुसळधार पावसाने शेतात देखील पाणी साचले असून गेल्या काही दिवसापासून कोरडी असलेली कयाधू नदी आता खळखळून वाहू लागली आहे. परभणीत वादळी वार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात ओढ्या नाल्यांसह, शेतशिवारात पाणीच पाणी झालं. परभणी, मानवत, पाथरी, सेलु, जिंतूर, पुर्णा, गंगाखेड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर पहाटेपर्यंत कायम होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola