Bhiwandi Fire : भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गाजवळ वडपा ग्रामपंचायत हद्दीत एका गोदामाला भीषण आग
भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गाजवळ वडपा ग्रामपंचायत हद्दीत एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीत गोदामात झोपलेले २ कर्मचारी होरपळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..
या गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडाचे साहित्य आणि कागदी पुठ्ठे होते. ते आगीत जळून खाक झालेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे..