Kolhapur Crime : कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, एका कैद्याचा मृत्यू
कोल्हापूरचे कळंबा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीत एका कैद्याचा मृत्यू झालाय. निशिकांत कांबळे असं मारहाणीत मृत्यू झालेल्या कैद्याचं नाव आहे. निशिकांत आणि इतर चार कैद्यांमध्ये वाद झाला आणि या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. याच हाणामारीत बेदम मार लागल्याने त्याचा मृत्यू झालाय. या प्रकरमी मारहाण करणाऱ्या चार कैद्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.