Bhiwandi : बकरी ईदच्या दिवशी भिवंडीत तणाव, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप, तणाव निवळला
Continues below advertisement
Bhiwandi : गुरुवारी बकरी ईद असल्याने भिवंडी शहरात दिवसभर झालेली कुर्बानी नंतर जनावरांची घाण अर्थातच अपशिष्ट वाहुन नेण्यासाठी नेमलेल्या वाहनातून घाण शहर बाहेर टाकली जात असताना रात्री शहरातील अप्सरा सिनेमा ते टेमघर येथील रस्त्यावर बकरी ईद मध्ये कुर्बानी दिलेल्या जनावरांचे अवयव व अपशिष्ट ( घाण ) रस्त्यात पडल्याने तणाव वाढला.या घटनेची माहिती मिळताच नविबस्ती, टेमघर पाडा,भादवड येथील स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून जय श्री राम च्या घोषणा देत संताप व्यक्त करण्यास सुरवात केली.या घटनेची माहिती स्थानिक शांतीनगर पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिस कुमक दंगल विरोधी पथक घटनस्थळी दाखल होत त्यांनी नागरिकांना शांत करीत पांगविले.
Continues below advertisement