Sharad Pawar on Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीवरुन आरोपांनंतर पवारांचे फडणवीसांना सवाल

Continues below advertisement

Sharad Pawar on Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीवरुन आरोपांनंतर पवारांचे फडणवीसांना सवाल

राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक ठरलेल्या पहाटेच्या शपथविधीची. असा शपथविधी ज्याच्या मागची सूत्र आणि तडजो़ड ही महाराष्ट्रासाठी कायमच प्रश्नार्थक राहिली आहेत. पण हळूहळू का होईना आता या शपथविधीमागची गुपितं बाहेर प़डू लागली आहेत... पहाटेच्या शपथविधी ही पवारांचीच खेळी होती अशी दबक्या आवाजात चर्चा होती. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदर्शनला  दिलेल्या मुलाखतीत शपथविधीबाबत मोठा दावा आणि गौप्यस्फोट केला. पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता, असा मोठा दावा फडणवीसांनी केलाय. 'शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी ऐनवेळी पवारांनी माघार घेतली, असा आरोप फडणवीसांनी केलाय. दरम्यान फडणवीसांचा दाव्यावर प्रतिक्रिया देताना सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा दिल्याचं शरद पवारांनी मान्य केलं खरं. पण डबल गेम केल्याचा दावा करणाऱ्या फडणवीसांना पवारांनी गुगलीनं उत्तर दिलं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram