Bhandup : भांडूपमध्ये शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव
Bhandup : भांडूपमध्ये शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव
भांडूपमध्ये एका शाळकरी मुलीने लैंगिक अत्याचार आणि अपहरणाचा रचला बनाव, प्रत्यक्षात आई अभ्यासावरुन रागावली म्हणून केला बनाव, भांडूप पोलिसांनी केला प्रकरणाचा पर्दाफाश भांडुपमध्ये एका शाळकरी मुलीने आई अभ्यासावरून रागावली म्हणून स्वत:च्याच अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा बनाव केल्याची घटना भांडुपमध्ये घडली आहे. घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळल्याने पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी करताच हा बनाव असल्याचे उघडकीस आले. भांडुप परिसरात अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसह राहते. शनिवारी सकाळी पाऊणेसातच्या सुमारास मुलगी नेहमीप्रमाणे शाळेसाठी घराबाहेर पडली. शाळा सुटली तरी ती घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. ती सापडली नाही. त्यानंतर थेट सायंकाळी चारच्या सुमारास मुलगी घरी परतली. शाळेत जात असताना रिक्षातून आलेल्या तिघांनी तोंडाला रुमाल बांधून ठाण्याच्या दिशेने नेले. तेथे लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, अशी माहिती आईला दिली. त्यामुळे आईने मुलीसह भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले. मात्र मुलगी सांगत असलेली कोणतिही घटना सीसीटिव्हीत दिसत नव्हती पोलिसांनी मुलीला विश्वासात घेत अधिक चौकशी केल्यानंतर आईसोबत वाद झाल्याच्या रागातून हा बनाव कचल्याचे सांगितले मात्र मुलीच्या तक्रारीवर नोंदवलेला तो अज्ञांविरोधातल गुन्हा रद्दा करणे ही पोलिसांची डोकेदुखी झाली आहे.