Vegetable Rates high : पावसाळ्याच्या तोंडावर भाजीपाला महागला, टोमॅटोला प्रति कॅरेट 2 हजारांचा भाव
Continues below advertisement
ऐन पावसाळ्यात भाज्यांचे दर गगनाला भिडलेत. भाजीपाल्यांसह टोमॅटोच्या प्रचंड वाढ झालीय. पाकिस्तानमध्ये टोमॅटोला मोठी मागणी असल्यानं भारतातील अनेक भागातून टोमॅटो पाकिस्तानाला निर्यात केले जातायंत. पूर्व विदर्भात स्थानिक पातळीवर उत्पादित केला जाणारा टोमॅटोचा पीक मे महिन्यानंतर बाजारात येत नाही. त्यामुळे विदर्भातील बाजरात टोमॅटो दुर्मिळ झालाय. परिणामी टोमॅटोचे वाढ वाढलेत. परिणामी भंडारा, नागपूरसह विदर्भातील बाजारपेठांमध्ये आता दक्षिणेतून टोमॅटोची आयात केली जातेय. आधी शेतकऱ्यांच्या स्थानिक टोमॅटोला प्रति कॅरेट 300 रुपयांपर्यंत दर मिळत होता. आता दक्षिणेतून येणाऱ्या टोमॅटोला एका कॅरेटमागे तब्बल दोन हजार रुपये मोजावे लागत आहे.
Continues below advertisement