Mumbai BEST Buses : भाऊबीजेनिमित्त BEST ची महिलांना अनोखी भेट, 70 मार्गांवर महिलांसाठी 100 बसेस
abp majha web team
Updated at:
06 Nov 2021 01:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत बेस्टनं महिलांसाठी अनोखी भाऊबीज भेट दिली आहे. मुंबईतल्या 70 मार्गांवर महिलांसाठी नव्या 100 बेस्ट बस धावणार आहेत. या बेस्ट बसेसचं उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. या शंभर बसेसपैकी 90 टक्के गाड्या वातानुकूलित असतील. 10 मार्गांवर फक्त महिला स्पेशल बसगाड्या असतील. तर उर्वरित मार्गावर महिलांना प्राधान्य असेल.